भाजप सत्ता स्थापनेचा आता प्रयत्न करणार: नारायण राणे
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीने त्यांची बोलणी अजूनही सुरु असल्याचंच सांगितलं असताना नारायण राणे यांनी मात्र एक मोठा खुलासा केला आहे.

काल सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप 'वेट अँड वॉच' या भूमिकेत असल्याचं सांगितलं होतं. पारंतू आज मात्र भाजपची भूमिका पूर्णपणे बदलली आहे असं दिसून येतंय. कारण भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना, "भाजप आता पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे," असं सांगितलं.

ते म्हणाले, "मी देवेंद्र फडणवीस यांना आज भेटलो आणि त्यांनी मला सरकार स्थापन करण्याच्या कमला लागा असं सांगितलं आहे."

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे, "राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल ही अपेक्षा," असं मत मांडलं आहे.

पहा त्यांचं ट्विट

इतकंच नव्हे तर शिवसेना आणि महाआघाडीवर टीका करत ते म्हणाले, "महायुती हे वाचन नव्हतं का? ते पाळलं गेलं का शिवसेनेकडून? मला अजिबात वाटत नाही की शिवसेना महाआघाडी सोबत जाईल. आणि दुसरं म्हणजे महाआघाडी फक्त बैठका घेऊन शिवसेनेला उल्लू बनवायचं काम करत आहे."