BJP-Shiv Sena UBT Credit War: पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनापूर्वी दिघा स्टेशनवर भाजप-UBT शिवसेना समर्थक आमनेसामने; पहा व्हिडिओ
BJP-UBT Shiv Sena supporters face off (PC - X/ANI)

BJP-Shiv Sena UBT Credit War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये आज राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केले. यानंतर, शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (Shivdi-Nhava Sheva Atal Setu) च्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मुंबईला गेले. दिघा रेल्वे स्थानकाचे (Digha Station) उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार होते. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी दिघा स्थानकात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राजन विचारे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दिघा स्थानकावर आल्यानंतर पोलिस आणि राजन विचारे यांच्यात बाचाबाची झाली. (हेही वाचा - PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video))

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी मोदी समर्थक घोषणाबाजी सुरूच ठेवली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे पूर्ण झाली, तरीही निमंत्रण पत्रकातून म.वि.च्या नेत्यांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी रोष व्यक्ते केला. (हेही वाचा -PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशातील सर्वात लांब पुल 'अटल सेतू'चे उद्घाटन; Watch Video)

तथापी, राजन विचारे यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. मोदी यांच्या हस्ते होणार्‍या उद्घाटनामुळे आधीच उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची लक्षणीय गर्दी असल्याने ठाकरे गटाचे समर्थक जमा झाल्याने तणाव आणखी वाढला. राजन विचारे यांचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (हेही वाचा -PM Narendra Modi on Indian Economy in Nashik: भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पहा व्हिडिओ - 

राजन विचारे आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर, भाजप समर्थकांनी त्यांच्या 'मोदी-मोदी'चा नारा अधिक तीव्र केला आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. याशिवाय ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे-ठाकरे’च्या घोषणा दिल्या. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.