PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशातील सर्वात लांब पुल 'अटल सेतू'चे उद्घाटन; Watch Video
PM Modi Inaugurate Atal Setu (फोटो सौजन्य - X. ANI)

PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल पुलाचे (Atal Bihari Vajpayee Sewari - Nhava Sheva Atal Setu) उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 21.8 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे.

हा अटल सेतू मुंबई ते नवी मुंबई जोडेल. हा पूल देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी नवी जीवनरेखा ठरणार आहे. एका अंदाजानुसार, दररोज सुमारे 70 हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे 400 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय या पूलावर ट्रॅफिकची माहिती गोळा करण्यासाठी AI आधारित सेन्सर बसवले आहेत. (हेही वाचा - PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

अटल सेतूची वैशिष्ट्ये -

  • अटल सेतू 21.8 किमी लांब आहे.
  • 17,840 कोटी रुपये खर्चून तो तयार करण्यात आले आहे.
  • डिसेंबर 2016 मध्ये पायाभरणी झाली.
  • हा सेतू 16.5 किमी समुद्रावर आणि 5.5 किमी जमिनीवर बांधला आहे.

भारतातील सर्वात लांब सागरी पूल -

अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याद्वारे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.