Sanjay Raut, Narayan Rane (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. याच मुद्द्यावरून भाजपनेते नारायण राणे यांनी संजय राऊत नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला, अशा आशयाचे ट्विट करत नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे कधीच नसते. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केले आहे. या सगळ्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर करावे, असे माझे मत आहे. उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे. महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत पण त्यांच्यासोबत सर्वांनीच केले पाहिजे,” असेही यावेळी ते म्हणाले होते. या वक्तव्यावर नारायण राणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे देखील वाचा-'राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक निश्चित जिंकतील पण पक्ष फुटेल' काँग्रेस नेत्याचा इशारा

नारायण राणे यांचे ट्विट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बरेच निर्णय घेतले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही योग्य निर्णय घेतलेला नाही, असा आरोप विरोधी पक्षातील नेते वारंवार करत आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.