'राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक निश्चित जिंकतील पण पक्ष फुटेल' काँग्रेस नेत्याचा इशारा
Congress | (File Photo)

काँग्रेस पक्ष (Congress Party) अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना काँग्रेस नेत्यानेच इशारा दिला आहे. या नेत्याने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली तर त्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) निश्चित जिंकतील पण त्यामुळे पक्ष फुटेल. काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विटरद्वारे हा इशारा दिला आहे. प्रमुख्याने काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची मागणी करणाऱ्या नेत्यांवर निरुपम यांनी निशाना साधला आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये ज्या संघटनात्मक निवडणुकीची मागणी काही नेते मंडळी करत आहे. देशात किती राजकीय पक्षांमध्ये अशा पद्धतीने निवडणुका झाल्या आहेत. आजच्या काळात काँग्रेस पक्ष अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे पक्षासाठी घातक आहे. जरी निवडणुका झाल्या तरी लोकप्रियतेच्या काणास्तव राहुल गांधी हेच निवडणूक जिंकतील. हे निश्चित. परंतू त्यामुळे पक्षाचे विभाजन होईल.

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. या पत्रात काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि सक्रीय अध्यक्ष हवा अशी मागणी करण्यात आली होती. या पत्रावरुन काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये जोरदार घमासान झाले. तसेच, पुढील सहा महिने सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असतील. त्यानंतर पुढे अध्यक्ष निवडला जाईल, असे ठरले. मात्र, या पत्र आणि बैठकीचे पडसाद काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहे. (हेही वाचा, Monsoon Session of Parliament: संसद अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये हालचाल; जयराम रमेश, गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा यांच्याकडे महत्वाची जबाबदारी)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री मकुल वासनिक, मिलिंद देवरा, आनंद शर्माक, शशी थरुर, गुलाम नबी आजाद यांच्यासह जवळपास 23 मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पक्ष लिहिले होते. या पत्राला पाठिंबा देणारे आणि या पत्राच्या विरोधात असलेले असे दोन गट काँग्रेसमध्ये निर्माण झालेले दिसतात. विशेष म्हणजे हे दोन्ही गट गांधी कुटुंबीयांना पाठिंबा देतात.