चंद्रपूर (Chandrapur) शहरातील महेश अहिर (Mahesh Ahir) आणि हरीश धोटे या दोन तरुणांचा मृतदेह चंदीगड (Chandigarh) येथील जंगलात आढळून आला. दोघांचेही मृतदेह चंदीगड शहरातील कजेहडी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतांपैकी महेश अहिर हा भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा सख्खा पुतण्या आहे. दोन्ही युवक 14 मार्च (2023) पासून बेपत्ता होते. दोघेही वयाने अनुक्रमे 26 आणि 27 वर्षांचे होते. दोघांचेही मृतदेह जंगलात आढळे आल्याने ही आत्महत्या (Suicide) आहे की त्यांच्या मृत्यूपाठीमागे आणखी काही कारण आहे याबाबत माहिती अद्याप पुढे आली नाही.
महेश अहिर आणि हरीश धोटे हे दोघेही एकमेकांचे अतिशय जवळचे असे जिवलग मित्र होते. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे जात असल्याचे सांगून दोघेही घरातून बाहेर पडले होते. मात्र, ज्या ठिकाणी जाणार असे सांगून ते घराबाहेर पडले त्या ठिकाणी (उज्जैन) येथे ते पोहोचलेच नाहीत. तसेच, दोघांशीही संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये दोन्ही युवक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तेव्हापासून दोघांचा शोध घेतला जात होता. दोन्ही युवकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची घटना पुढे आल्याने चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Physical Intercourse: शरीरसुख मागणाऱ्या पतीचा बायकोकडून काटा; अनैतिक संबंधाचा आरोप जीवावर बेतला)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका वाटसरुने दोन युवकांच्या मृतदेहांबाबत पोलिसांना प्रथम माहिती दिली. चंदीगड येथील सेक्टर 52 मधील जंगलात दोन तरुणांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याचे या वाटसरुने पोलिसांना बुधवारी (22 मार्च) सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन्ही युवक मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सेक्टर 16 येथील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोन्ही युवक मृत झाल्याचे सांगितले. मृतदेहावरील कपडे आणि वस्तुंमध्ये प्रवासाची तिकीटे आढळून आली. या तिकीटांवरुन हे दोन्ही युवक उत्तराखंड येथील डेहराडून येथून रस्ते वाहतुकीद्वारे शहरात पोहोचले. घटनास्थळावरुन दारुची बाटली आणि ग्लास पोलिसांनी जप्त केला आहे.