Ashish Shelar Criticizes Shiv Sena: शिवसेनेचेच शुद्धीकरण करावे लागेल, आशिष शेलार यांचा टोला
Ashish Shelar, Udhav Thackeray (Photo Credit: Facebook)

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणि भाजप नेत्यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. मात्र, त्यानंतर शिवसैनिकांनी तात्काळ बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी पोहोचून शुद्धीकरण केले आहे. ज्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्या वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच शुद्धीकरण करायचे असेल तर, शिवसेनेचे करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. यामुळे शिवसैनिकांनी दूध, गोमुत्र आणि फुले टाकून बाळासाहेबांच्या स्मारकाचे शुद्धीकरण केले आहे. अप्पा पाटील आणि इतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुळात शुद्ध आणि अशुद्ध असा भेदभाव मानणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरे यांना मानणाऱ्या पक्षाची आहे, राज्याच्या संस्कृतीची ही विदारक स्थिती आहे. ती जागा कोणाच्या मालिकेची नसून मुंबई महानगरपालिकेची आहे. यामुळे कोणीही त्या ठिकाणी जाऊन शकते. शुद्धीकरण करायचे असेल तर शिवसेनेचेच करावे लागेल. विश्वासघात करायचा आणि सोनिया गांधी यांच्यासोबत सत्तेत जायचे. तर, आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची शपथ घ्यायची. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना तरूंगात टाकले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केले आहे. या शिवसेनेचे शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेने शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- PM Narendra Modi Temple: पुणे येथील मंदिरातून नरेंद्र मोदी यांची मूर्ती गायब, थेट पीएमओ कार्यालतातून आदेश आल्याची चर्चा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला आज मुंबई सुरुवात झाली आहे. त्यानंतर नारायण नाणे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मारकाला आभिवादन करीत मुंबईतील विविध ठिकाणी भेट दिली.