पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भक्त असलेल्या एका भक्ताने पुण्यात चक्क त्यांचे मंदिर (PM Narendra Modi Temple) उभारले. या भक्ताच्या कृतीची थेट पंतप्रधान कार्यालयातून दखल घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या आदेशानुसार पुणे (Pune) येथील मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती रातोरात गायब झाली अशी चर्चा आहे. पुणे येथील औंध परिसरात मयुर मुंडे नामक व्यक्तीने 'मोदी मंदिर' (Modi Temple Pune) उभारले. मयुर मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अशा पुण्यात 'मोदी मंदिर' उभारण्यात आल्याने या मंदिराची पुणे शहर आणि महाराष्ट्रातही चर्चेचा विषय ठरले होते.
पुण्यात उभारलेल्या मंदिरातून आश्चर्यकारक पद्धतीने रातोरात मोदींची मूर्ती हटविण्यात आली आहे. ही मूर्ती नेमकी कोणी हटवली याबाबत माहिती मिळू शकली नाही. सांगितले जाते आहेकी थेट पंतप्रधान कार्यालयातून आदेश आल्याने ही मूर्ती हटविण्यात आली. दरम्यान, काहींचे म्हणने असे की, ही मूर्ती हटविण्यात यावी याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता. मूर्ती हटविण्यात आल्याबाबतची चर्चा होते आहे. परंतू, त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून खरोखरच काही सूचना, फोन आला होता का? याबाबत पूष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, BJP on Maharashtra Government: महाविकासआघाडी सरकार पडणार ते पडेल! आणि आता स्वत:हूनच कोसळेल, महाराष्ट्र भाजप भविष्यकारांची कशी बदलली भाषा)
भाजप कार्यकर्ते असलेल्या मयूर मुंडे यांनी हे मंदीर उभारले होते. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच मंदिर अभारल्याने त्यांच्या भक्तांनी आणि बघ्यांनी मंदिर पाहण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत होते. अनेक भक्त तर येथे येऊन पाया पडत असल्याचेही पाहायला मिळाले. मंदिराजवळ लिहिलेली पंतप्रधान मोदी यांच्या आरतीचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
ट्विट
Mayur Munde a #BJP worker from Pune has built a temple of Prime Minister Narendra Modi in Aundh area of Pune. Spent Rs 1.5 Lakhs and 6 months to get the work completed.#Pune pic.twitter.com/uHaOPAG8LI
— Ali shaikh (@alishaikh3310) August 17, 2021
पुण्यात मोदी मंदिर उभारण्यात आले असले तरी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे पुणे भाजप शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी हे मंदिर उभारले होते. या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला होता. या मंदिरास एकूण खर्च 1.60 लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले सांगण्यात आले होते.
ट्विट
एका माथेफिरू मोदीभक्ताने नरेंद्र मोदींचं मंदिर पुण्यात बांधलं. या मंदिराला भेट देऊन पेट्रोल, डिझेलचा नैवेद्य दाखवून साकडं मागण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलो. मात्र आम्ही येण्यापूर्वीच मोदीजी इथून झोला उचलून निघून गेल्याचं निदर्शनास आलं. pic.twitter.com/Dp7PYJwGik
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 19, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसने साधला निशाणा
दरम्यान, मोदी मंदिरावरुन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र जोरदार निशाणा साधला आहे. मोदी मंदिर उभारल्याचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चक्क या मंदिरात जाऊन मोदी देवाची पूजा करण्याचा कार्यक्रम आखला. तसेच, पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी या देवाला साखडे घालण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता. परंतू, मंदिरातील मूर्तीच गायब झाल्याने राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला.