पंतप्रधान मोदींचे चिंतन अंदमानच्या सागरात वाहून गेले - शिवसेना
Uddhav Thackeray slams Pm Naraendra Modi | (Photo courtesy: archived, edited images)

भाजप सरकारच्या (BJP Government) कळात राममंदिरही झाले नाही आणि वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ (Bharat Ratna Award) देखील मिळाले नाही हे दुर्दैव आहे!, असे सांगत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी (Pm Naraendra Modi) अंदमानला गेले. वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) ज्या काळकोठडीत काळ्या पाण्याच्या दोन जन्मठेपा भोगीत होते त्या कोठडीत काही काळ डोळे मिटून बसले व चिंतन केले. ते चिंतन अंदमानच्या सागरात वाहून गेले, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील एनडीएप्रणीत भाजप सरकारवर चढवला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने देशातील काही नामवंतर कलाकार आणि व्यक्तिमत्वांना ‘पद्म’, ‘रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सन्मानावरुन प्रस्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनामध्ये 'रत्न, पद्म आणि वीर सावरकर' मथळ्याखाली लेख लिहिला आहे, या लेखत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. या लेखात ते म्हणतात, प्रजासत्ताक दिनाचा आणखी एक सोहळा पार पडला आहे. राजपथावर नेहमीप्रमाणे शक्तिप्रदर्शन करून जगाचे डोळे दिपवले गेले. दरवर्षीच हे होत असते तसे ते यावेळीही घडले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी संदेश दिला, पण राजपथावरील शक्तिप्रदर्शन, राष्ट्रपतींचा संदेश यांची चर्चा न होता सरकारतर्फे ‘भारतरत्न’ किंवा ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली त्यावरच चर्चा सुरू आहे. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो यावेळी काँगेस ‘मुशी’त तयार झालेले ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला. त्याचवेळी नानाजी देशमुख, संगीत क्षेत्रातील ‘असामी’ भूपेन हजारिका यांनाही ‘भारतरत्न’ने सन्मानित केले. यापैकी नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवट स्वयंसेवक होते. सध्या सरकार ज्या विचारांचे आहे, त्या विचारांना ज्यांनी बळकटी दिली अशा धुरिणांचा ‘सन्मान’ करणे गैर नाही. भूपेन हजारिकांचेही योगदान संगीतात आहे, पण ते ‘भारतरत्न’च्या तोलाचे आहे काय? अशी टीका सुरू आहे. आसामातील लोकसभा निवडणुकांवर ‘डोळा’ ठेवून हजारिकांना मरणोत्तर वापरले असेल तर ते योग्य नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मलाच वेगळा न्याय का? एकनाथ खडसे यांनी भाजपला खडसावले)

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मखर्जी यांनाही ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्या आले. यावर ठाकरे म्हणतात, प्रणव मुखर्जी यांच्याविषयी अलीकडे भाजपास प्रेमाचे भरते आले आहे. प्रणव मुखर्जी हे ‘भारतरत्न’ होते तर मग श्री. मोदी किंवा भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी संधी का दिली नाही? मोदी म्हणतात, प्रणवबाबू हे राजकारण, प्रशासन वगैरेतील मार्गदर्शक, भीष्मपितामह आहेत व राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांनी आपल्याला सांभाळून घेतले. मग इतक्या महान व्यक्तिमत्त्वास मोदी सरकारने पुन्हा संधी दिली असती तर ही निवडणूक बिनविरोधच झाली असती. प्रणव मुखर्जी हे प्रथम राष्ट्रपतीपदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांना भाजपने ‘काँग्रेसवाले’ म्हणून विरोध केला व त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवला. प्रणव मुखर्जी यांच्या ज्या योग्यतेचे गुणगान आता मोदी सरकार करीत आहे, त्याच योग्यतेचे भान ठेवून शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना त्यावेळी पाठिंबा दिला होता व भाजपने त्याबद्दल आमच्या विरोधात काहूर माजवले होते. हे झाले पहिल्या वेळी. दुसऱ्या वेळी त्याच महान योग्यतेच्या जागेवर रामनाथ कोविंद यांची नेमणूक झाली तेव्हा झिडकारलेले प्रणव मुखर्जी आज मोदी राज्यात ‘भारतरत्न’ ठरले याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी मुखर्जी यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा योग्यच होता व त्यावर भाजपने आता शिक्कामोर्तब केले.

ज्यांना ‘पद्म’ आणि ‘रत्न’ पुरस्कार दिले ते आपापल्या स्थानावर योग्य आहेतच, पण सातत्याने मागणी होऊन आणि लोकभावना तीव्र असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’चा बहुमान का मिळू शकला नाही? वीर सावरकरांत असे काय कमी पडले की, मोदींचे सरकारही त्यांचा हा सन्मान करू शकले नाही. हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या व स्वातंत्र्ययुद्धात महान त्याग करणाऱ्या वीर सावरकरांची काँगेस राजवटीत उपेक्षा केली गेली आणि अपमान झाला, पण मोदी सरकारने त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय केले?, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केले आहे.