BJP candidate Geeta Sutar elected sangli Mayor (PC - Facebook)

सांगली महापालिकेच्या (Sangli Municipal Corporation) महापौरपदी (Mayor) भाजप पक्षाच्या गीता सुतार (BJP Candidate Geeta Sutar) यांची निवड करण्यात आली असून उपमहापौरपदी आनंदा देवमाने (Ananda Devmane)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. गीता सुतार यांनी काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांचा 43 विरुद्ध 35 मतांनी केला पराभव केला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे. काँग्रेस आघाडीकडून नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजपच्या 41 सदस्यांसह दोन सहयोगी सदस्यांनीही गीता सुतार यांना मतदान केले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकूण 35 सदस्यांनी वर्षां निंबाळकर यांना मतदान केले. (हेही वाचा- नांदेड, अहमदनगर, परभणी महापालिका पोटनिवडणूक निकाल 2020: काँग्रेस पक्षाने मारली बाजी, वाचा सविस्तर)

सांगली महापालिकेच्या महापौरपदासाठी गीता सुतार आणि उपमहापौरपदासाठी आनंदा देवमाने यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बंडखोरीचा फटका बसू नये, म्हणून भाजपने दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक उमेदवार निश्‍चित केला होता. सांगली महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. भाजपच्या वतीने महापौर पदासाठी कोणाचे नाव समोर येणार याची सर्वांना उत्सुकता होती. भाजपने गीता सुतार यांचे नाव निश्चित केले होते. आज त्यांची सांगलीच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे.