Sanjay Raut On BJP: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकते. सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) आणि गोध्रासारख्या घटना भाजप करू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी भाजपवर आणखी निशाणा साधताना म्हटलं आहे की, लोकांच्या मनात भीती आहे की राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचे नाटक करू शकतात. सत्यपाल मलिक यांनी आरोप केला की पुलवामा घडला नाही तर घडला होता. गोध्राबाबत सर्वांचेच म्हणणे आहे. 2024 ची निवडणूक जिंकायची असेल तर ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून गोंधळ घालू शकतात. (हेही वाचा - शिंदे गटातील आमदार Santosh Bangar यांच्याविरोधात गुन्हा दाखल)
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला ही भीती आहे की जेव्हा राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, तेव्हा देशभरातून लोकांना अयोध्येला बोलावले जाईल, त्यांना ट्रेनमधून आणले जाईल. अशा भागात अशा विभागातून गाड्यांवर दगडफेक होऊ शकते. आगीचे गोळे फेकले जाऊ शकतात. देशभरात दंगली भडकवण्यात येऊ शकतात.
दरम्यान, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ही भीती प्रमुख राजकीय पक्षांच्याही मनात आहे. प्रत्येक गोष्ट लोकांसमोर ठेवणे हे आपले काम आहे. असे होत नसेल, तर ही घटना थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे. हरियाणात ज्या दंगली घडल्या किंवा भडकवल्या गेल्या हे त्याचे उदाहरण आहे.