अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी महराष्ट्र पोलिसांसोबतच बिहार पोलिस देखील तपास करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान यामध्ये रोज नवी गुंतागुंत समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बिहार आयपीएस ऑफिसर विनय तिवारी (Binay Tiwari) मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटीन केल्याने देखील राजकारण रंगलं होते. मात्र आता याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेचे अॅडीशनल म्युनिसिपल कमिशनर पी. वेलरासू यांनी IGP Patna (Central)यांना पत्र लिहून होम क्वारंटीन असलेले ऑफिसर महाराष्ट्र सरकारच्या अधिकार्यांसोबत सल्लामसलत करून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे काम करू शकतात. यासाठी ते झूम, गूगल मीट, जिओ मीट आणि अन्य प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात असेदेखील पत्रामध्ये स्प्ष्ट केले आहे.
बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांच्या क्वारंटाईन प्रकरणावरुन निर्माण झालेल्या वाद निर्माण झाला होता. एसओपीच्या नियमानुसारच सर्व काही करण्यात आले आहे. कोणावरही सक्ती करण्यात आली नाही अशी प्रतिक्रिया पालिका प्रशासनासोबतच मुंबई महापौरच्या किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.
ANI Tweet
BMC Addl Municipal Commissioner wrote to IGP Patna (Central) on Aug 4 over quarantine of Bihar IPS Officer, in Mumbai. Letter reads 'He can conduct proceedings with Maharashtra Govt's concerned officials on digital platforms like Zoom/Google Meet/Jio Meet or other such platforms' pic.twitter.com/FVP2Rx7H9x
— ANI (@ANI) August 6, 2020
मुंबई महापालिकेने आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर ते गोरेगाव येथील एका गेस्टहाऊसमध्ये राहात आहेत. तिवारी यांच्या हातावर होम क्वारंटाईन असा शिक्काही मारण्यात आला आहे.
दरम्यान सुशांत सिंह राजपूत याने 14 जून दिवशी मुंबई मध्ये वांद्रे येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पाटणाहून सिंह कुटुंब मुंबईमध्ये आले येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र सुशांतचि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सह 6 जणांविरुद्ध सुशांतच्या कुटुंबाने पाटणा पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल केल्यानंतर आता बिहार पोलिस पथक देखील मुंबईमध्ये दाखल झाले असून तपास करत आहे.