Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचे स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राची स्थापना (Samyukta Maharashtra) हे स्वर्गीय बाळासाहेबांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,' असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले आहे. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,' असे अजित पवार यांनी बाळासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त म्हटले आहे. हे देखील वाचा- Balasaheb Thackeray 8th Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्कात लोकांची गर्दी, अत्यंत साधेपणाने स्मृतिदिन साजरा करण्याचा शिवसैनिकांचा निर्णय
बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी शिवाजी पार्कावर मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यंदा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.