Balasaheb Thackeray (Photo Credits: Wikimedia Commons)

Balasaheb Thackeray Death Anniversary: मराठी माणसाच्या हक्कासाठी जीवाचं रान करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 8 वी पुण्यतिथी. बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक वादळ होते. आपल्या भाषणाने, धाडसी कृत्याने लाखोंच्या गर्दीत उठून दिसणारे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासारखा कणखर व्यक्तिमत्व 'न भूतो न भविष्यति' होणार नाही असच आहे. ते जितके कणखर तितकेच विनोदी आणि तितकेच प्रेमळ देखील होते. त्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी शिवाजी पार्कात (Shivaji Park)  जमायला सुरुवात केली आहे. आज पहाटेपासून लोक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहे.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता यंदा हा स्मृतिदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला आहे. यामुळे आज शिवसेनेकडून कुठल्याही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण कुटूंब आज स्मृति स्थळाचे दर्शन घेण्यास येतील. राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी देखील स्मृतिस्थळांवर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. काल (16 नोव्हेंबर) शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 'या' 7 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? पहा 'हे' दुर्मिळ फोटो

23 जानेवारी 1926 रोजी केशव ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या घरी बाळासाहेबांचा जन्म झाला. केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः एक सामाजिक कार्यकर्ते व लेखक असल्याने कणखर बाणा आणि विचारसरणी ही कुटुंबाची देणगी बाळासाहेबांना लाभली होती.