ED Arrests Ex-Chairman Of Pune Co-op Bank: सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Cooperative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांना 421 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, एजन्सीने मुलचंदानीशी निगडीत 10 ठिकाणी शोध घेतला होता आणि 2.72 कोटी रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने, 41 लाख रुपयांची रोकड, आलिशान कार, डिजिटल उपकरणे आणि दोषी कागदपत्रे जप्त केली होती.
सेवा विकास सहकारी बँकेने अपात्र व्यक्ती आणि संस्थांना 430 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यासाठी मुलचंडी यांच्या अध्यक्षतेखाली 124 प्रस्तावांना मंजुरी दिली होती. सहकार सहाय्यक आयुक्त राजेश जाधव यांनी 2020 मध्ये कर्जाचे ऑडिट करून मुलचंदानी यांच्यासह पाच जणांविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा - Principal of Dr. D.Y. Patil English High School Pune Beaten Up: मुलींच्या वॉशरूम मध्ये कॅमेरे, विद्यार्थ्यांवर ख्रिश्चन संस्करांचे आरोप करत मुख्यध्यापकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बदडले (Watch Video))
एजन्सीने असे म्हटले होते की, बँक मुलचंदानी यांच्या कौटुंबिक मालकीप्रमाणे चालविली जात होती आणि निकषांचे पालन न करता कर्ज दिले गेले होते, ज्यामुळे 92% कर्ज खाती एनपीएमध्ये बदलली होती.