भिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार
Image used for represenational purpose (File Photo)

भिवंडी (Bhiwandi) शहरातील कामतघर येथील शिवसेना (Shivsena)  माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (वय- 68 ) यांची पोटच्या मुलाच्या हातुन निर्घृण हत्या (Murder) झाली आहे. कौटुंबिक वादातून गुरुनाथ यांचा मुलगा ब्रिजेश पाटील (Brijesh Patil) यांंनी सुर्‍याने वार करुन स्वतःच्या वडिलांंची हत्या केली आहे. नारपोली पोलिसांंकडुन (Narpoli Police)  ब्रिजेश याला अटक करण्यात आली आहे तसेच त्याच्यावर हत्येचा रीतसर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंंतर पोलिसांंनी गुरुनाथ यांंचा मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात (IGM Hospital)  शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ब्रिजेशने केलेले वार गुरुनाथ यांंच्या मान आणि तोंंडावर स्पष्ट दिसुन येत होते. संतापजनक! COVID-19 झाल्याच्या संशयातून फुटबॉलपटूकडून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाची हत्या

प्राप्त माहितीनुसार, गुरुनाथ पाटील आणि त्यांंचा मुलगा ब्रिजेश यांंच्यात एका वर्षापासुन सतत वाद होत होते, यावरुनच गुरुनाथ यांंनी नारपोली पोलिसांंकडे मुलाविरुद्ध तक्रारही केली होती.परंतु पोलिसांंनी हा घरगुती वादाचा प्रकार समजुन ब्रिजेश याच्या विरुद्ध केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्याला सोडुन दिले होते. यावेळेस मात्र हा वाद इतका वाढला की रविवारी वडील गुरुनाथ हे घरात झोपलेले असताना ब्रिजेश ने मटण कापायच्या सुर्‍याने वार करुन त्यांंची हत्या केली. नागपूर: काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या

दरम्यान या घटनेनंंतर भिवंंडीमध्ये सर्वांनाच धक्का बसला आहे. काहींंनी तर या मृत्यु साठी पोलिसांंना दोषी ठरवत जर का वेळीच गुन्हा दाखल करुन कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असेही म्हंंटले आहे. स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांंनी सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.