नागपूर: काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या
नागपूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. देवा उसरे आय सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Deva Usare Murdered: नागपूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे (Former Congress Corporator Deva Usare) यांची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. देवा उसरे आय सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
देवा ऊसरे हे नागपूरमधील गड्डीगोदाम येथे राहत असतं. देवा हे दररोज गड्डीगोदाम येथील चौकाताली चहा टपरीवर येऊन बसतं. आज ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरण्यासाठी आले होते. त्यांनी चौकातील चहाच्या टपरीजवळ आपली दुचाकी लावली होती. यावेळी काही समजण्याच्या आत दोन अज्ञात व्यक्तींनी देवा यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. (हेही वाचा - अहमदनगर: बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने पीडितेच्या मुलीवर पेट्रोल टाकून दिले पेटवून!)
देवा यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे देवा उसरे रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर देवा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. देवा यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण उसरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2020 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

