Bharat Bandh: पुणे येथे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा पण APMC मार्केट सुरु राहणार
Pune APMC (Photo Credits-ANI)

Bharat Bandh: दिल्लीत केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन केले जात आहेत. याच आंदोलक शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभुमीवर पुण्यात (Pune) आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला जाणार आहे. परंतु APMC मार्केट सुरु राहणार आहे.(Bharat Bandh: भारत बंदच्या दिवशी मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा सेवा प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणेच सुरु राहणार)

एपीएमसी मार्केटमधील स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी असे म्हटले आहे की, आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहोत. पण आज मार्केट सुरु ठेवण्यात येणार आहे. कारण विविध राज्यातून येणारा शेतीमालाची साठवणूक करता येईल. अन्यथा ते कुजतील पण त्याची उद्या विक्री केली जाणार असल्याचे पायगुडे यांनी सांगितले.(Bharat Bandh: बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भारत बंदच्या पार्श्वभुमीवर रेल्वे रोको आंदोलन)

Tweet:

दरम्यान, वाशी मधील एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचसोबत कोल्हापूर, औरंगाबाद आणि पंढरपूर मध्ये ही भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.  मात्र नागपूर मधील एपीएमसी मार्केट सुरु ठेवण्यात आले आहे.  त्यामुळे बाजार समित्यांमध्ये  भाजीपाल्याची आवक घटल्याची दिसून आली आहे. (Bharat Bandh: शेतक-यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' शी संबंधित 'ही' आहे महत्त्वाची माहिती)

दिल्लीत शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. तर याआधी दोन वेळेस केंद्रासोबत शेतकऱ्यांच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज भारत बंदच्या दिवसानंतर 9 डिसेंबरला ही केंद्राची शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत पुन्हा एकदा  बैठक पार पडणार आहे.