भारत बंद (Photo Credits-ANI)

Bharat Bandh: देशभरासह आज राज्यात केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. तर दिल्लीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडून आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेच. मात्र आज राज्यात ही भारत बंदला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून भारत बंदला आपले समर्थन दर्शवले आहे. याच पार्श्वभुमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही यामध्ये सहभागी झाले असून त्यांनी भारत बंद रेल्वे रोको आंदोलन केले.(Bharat Bandh: भारत बंद संबंधित केंद्र सरकारकडून Advisory जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

बुलढाण्यात भारत बंद रेल्वो रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरुन पोलिसांनी पांगवले गेले.(Bharat Bandh: पुणे येथे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा पण दुकाने बंद राहणार नाहीत, व्यापारी महासंघाचा निर्णय)

Tweet:

दरम्यान, मुंबईत भारत बंदच्यादरम्यान बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी नागरिकांसाठी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  तर शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे केंद्र सरकारला सातत्याने सांगत आहे. त्यामुळे जर या मागण्यांवर लवकरच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा ही आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.