Bharat Bandh: केंद्राच्या (Central Government) कृषी कायद्याच्या (Farm Laws) विरोधात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहे. यासाठीच 8 डिसेंबरला भारत बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. या बंदला काही राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. परंतु पुणे येथे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला गेला आहे. पण दुकाने बंद राहणार नसल्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे.(Bharat Bandh: नवी मुंबई APMC मार्केट उद्या बंद, शेतकरी आंदोलनास पाठींबा; माथाडी कामगार संपावर)
कोरोनाच्या काळात आधीच व्यवसाचे नुकसान झाले असल्याने दुकाने बंद ठेवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला जाईल असे ही व्यापारी महासंघाने म्हटले आहे.(Bharat Bandh: भारत बंदच्या दिवशी मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा सेवा प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणेच सुरु राहणार)
शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या फार्म बिलाच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पूर्णपणे पाठिंबा दर्शवला गेला आहे. तर कालच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार आता शिवसेना ही या फार्म बिलाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवणार आहे. त्याचसोबत आम आदमी पार्टी, काँग्रेसने ही यामध्ये आपला सहभाग असणार असल्याचे म्हटले आहे.(Bharat Bandh: भारत बंद संबंधित केंद्र सरकारकडून Advisory जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)
शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे केंद्र सरकारला सातत्याने सांगत आहे. त्यामुळे जर या मागण्यांवर लवकरच निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा ही आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.