कोकणवासियांसाठी खास असलेल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी (Bharadi Devi Yatra 2023) आता चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा 4 फेब्रुवारी दिवशी मालवणात आंगणेवाडीच्या (Anganewadi) भराडीदेवीची यात्रा असणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. 3 फेब्रुवारी पासून या विशेष ट्रेन्स धावणार असून पुढे होळी पर्यंत या ट्रेन्स चालू ठेवल्या जाणार आहेत. दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) चालवल्या जाणार्या या विशेष ट्रेन्सचं बुकिंग आजपासून (31 जानेवारी ) खुले करण्यात आले आहे. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी 18 विशेष ट्रेन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: Anganewadi Jatra 2023 Date: देवीचा कौल घेवून अंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली, 4 फेब्रुवारीला होणार अंगणेवाडी भराडी देवीची जत्रा .
लोकमान्य टिळक टर्मिनस वरून रात्री 10.15 ला ट्रेन रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 ला सूरतकल येथे पोहोचणार आहे. दर शुक्रवारी ही गाडी धावणार आहे. शनिवारी या गाडीचा परतीचा प्रवास सायंकाळी 7.40 ला सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी 2.25 ला एलटीटी स्थानकात संपणार आहे. दरम्यान या ट्रेनला महाराष्ट्रात ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सांवतवाडी रोड स्थानकांवर थांबा असेल.
पहा ट्वीट
Running of Additional Winter / Aanganewadi / Holi Special Trains @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @SWRRLY @GMSRailway pic.twitter.com/L45gQd0iKX
— Konkan Railway (@KonkanRailway) January 27, 2023
आंगणेवाडीच्या या यात्रेला यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजेरी लावत दर्शन घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच मालवणात देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शिंदे गटातील आमदार देखील त्यांच्यासोबत भराडी देवीच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.