Bhandara Flood: भंंडारा पुरग्रस्त भागातुन NDRF च्या पथकाने लहान मुले, गरोदर महिलेसहित 43 जणांंचे वाचवले प्राण, पहा फोटो
Bhandara Floods (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh)  मुसळधार पावसानंंतर पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील नदी काठावरील गावात पाणी शिरले आहे. या पुराचा सर्वाधिक फटका लाखांदूर व पवनी तालुक्यातील गावांना बसला आहे. त्याचसोबत अनेक गावांना पाण्याने वेढा घातल्याने दोन तालुक्यांमधील संपर्क जिल्ह्यांशी तुटला आहे. याच पार्श्वभुमीवर काल NDRF व SDRF ची पथके भंंडारा व ब्रम्हपुरी येथे बचावकार्यासाठी पोहचली आहेत, NDRF चे 21 कर्मचारी काल रात्रीपासुन या गावांंमध्ये बचावकार्य करत असुन आतापर्यंत 5 लहान मुले आणि गरोदर महिलेसहित 43 जणांंचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. नागपुर मध्ये पावसाचे थैमान! रामटेक येथे पुलाचा भाग कोसळला, पहा फोटो

वास्तविक, शनिवार पासून भंडारा जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र मध्य प्रदेशच्या संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला आणि कालीसागर या धरणातील पाणी सोडल्यामुळे भंडारा जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 वर नागपूर नाक्याजवळ भोजापूर नाल्यावर जवळपास 5 फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही बंद केलेला आहे. परिणामी या भागात वाहतुक सुद्धा ठप्प झाली आहे, ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी घरात सुद्धा पाणी शिरले आहे.

ANI ट्विट

दरम्यान अशी परिस्थिती पंधरा वर्षानंतर निर्माण झाली आहे. 2015 मध्ये सुद्धा संजय सरोवर आणि इतर धरणातून पाणी सोडल्याने असेच पूर संंकट ओढावले होते, सध्या खबरदारी म्हणुन 200 हुन अधिक जणांंना अन्न धान्य व इतर सामग्री सहित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.