जवान दत्तात्रय पाटील यांना कर्तव्यावर असताना वीरमरण; महाराष्ट्र हळहळला
दत्तात्रय पाटील ।PC: Twitter/Nana Patole

जळगाव मधील भडगाव तालुक्यातील भातखंडे मधील दत्तात्रय पाटील (Dattatray  Patil) या 40 वर्षीय सुपुत्राला वीरमरण आले आहे. दत्तात्रय युनिट बिकानेर मधून आगरतळा येथे जात असताना रेल्वे प्रवासात त्यांची तब्येत खालावली. पाटील यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. वाराणसी वरून मुंबईला विमानाने त्यांचे पार्थिव पाठवण्यात आले. त्यानंतर आता शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आज (5 जुलै) दिवशी भातखंडे मध्ये पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान पाटील कुटुंबियांचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी भेटून सांत्वन केले आहे. आज नाना पटोले यांनी देखील ट्वीट करत आपली आदरांजली अर्पण केली आहे. Agnipath Scheme: सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा 'अग्निपथ' योजनेला पांठिबा, म्हणाले - तरुणांना रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध.

नाना पटोले ट्वीट

जवान दत्तात्रय पाटील हे 2003 मध्ये नाशिकला सैन्यात भरती झाले. 305 फिल्ड रेजिमेंट मध्ये त्यांची सुरूवात झाले. भारतात हैदराबाद, बंगळूरू मध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 19 वर्षांच्या सैन्यदलातील सेवेत त्यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह-लडाख मध्ये सेवा दिली.