BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज 'Chalo Mobile Application' आणि 'Chalo Bus card' लॉन्च केले आहे. मुंबई मध्ये प्रवासासाठी मुंबई लोकल नंतर सर्वात सोयीची असणारी बेस्ट बस (BEST Bus) आता त्यांच्या ग्राहकांना अजून खास सुविधा देणार आहे. बेस्ट प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी खास अ‍ॅप लॉन्च करण्यात आलं आहे. बेस्टचे प्रवासी आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. स्मार्ट कार्डच्या आणि अ‍ॅपच्या मदतीने ते बस पास काढू शकणार आहेत तो रिन्यू करू शकणार आहेत. चलो मोबाईल अ‍ॅप आणि चलो बस कार्ड यासाठी मुंबईकरांना मदत करणार आहेत.

ऑनलाईन तिकीट बुकिंग सोबतच  'चलो अ‍ॅप' द्वारा केवळ बसचं लोकेशन प्रवाशांना समजणार असे नाही तर त्यासोबत ती बस तुमच्या जवळच्या बस स्टॉप वर येण्यासाठी किती वेळ लागणार? त्याबस मध्ये गर्दी आहे की नाही याची देखील माहिती मिळणार आहे. बेस्ट बस मध्ये आता कार्ड रिडर्स देखील असतील. लाईव्ह क्राऊड इंडिकेटर द्वारा  बस मध्ये आसन व्यवस्था रिकामी असेल तर त्या सीटची माहिती हिरव्या रंगात आणि गर्दीच्या बस मध्ये सीट नसल्याने ते लाल रंगात दर्शवले जाणार आहे. त्यामुळे आता अनेकांना प्रवासाचं प्लॅनिंग करणं सोपं होणार आहे. नक्की वाचा: ‘Bhau Beej’ चा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट; मुंबईत धावणार 70 मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस, इथे पहा संपूर्ण यादी .

काही महिन्यांपूर्वीच बेस्टने काही मार्गांवर इलेक्ट्रिक एसी सुरू केल्या आहेत. आता भविष्यात 2027 पर्यंत सार्‍या बेस्ट बस इलेक्ट्रिक करण्याचा मानस देखील बोलून दाखवण्यात आला आहे.