BEST BUS | TWITTER

मुंबई मध्ये लोकल नंतर बेस्ट बस (BEST Bus) या सार्वजनिक वाहतूक सेवेकडे फायदेशीर म्हणून पाहिलं जातं. मुंबईत नुकतीच एका बेस्ट बस ड्रायव्हरने बस थांब्यावर बस न थांबवल्याने तिघांनी चालकावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वांद्रे पूर्व (Bandra East) भागातील आहे. एसी बस बस स्टॉप वर न थांबवल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना 21 जून शुक्रवार ची आहे. चालक हा 52 वर्षीय बळवंत खानविलकर होता.

Times of India, च्या रिपोर्ट्सनुसार तीन प्रवाशांनी गर्दीने भरलेल्या एसी बसचा पाठलाग केला. नंतर बस चालक खानविलकरला मारहाण केली. मारहाण केलेल्यांमध्ये एक गोरक्ष सोनावणे 30 वर्षीय तरूण आहे. नेरूळचा रहिवासी असलेल्या या तरूणाने बेस्ट बस स्टॉप वर न थांबवल्याने चालकाला मारहाण केल्याचं म्हटलं आहे.

चालक खानविलकर याने बस पूर्ण भरलेली होती आणि वाहकाने पुढे जाण्याचा इशारा दिल्यानंतर बस पुढे नेली. त्याने आपण प्रवासी मागे धावत असल्याचं पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण केलेल्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्याने बस निर्धारित थांब्यावर थांबली नसल्याने आपला पारा चढला आणि मारहाण केल्याचं म्हटलं आहे.

खेरवाडी पोलिस स्टेशनच्या सिनियर इंस्पेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी बसचा पाठलाग केला आणि नंतर ती उघडण्याची मागणी करत दरवाजावर बुक्के मारले. या तिघांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी विंडशील्ड वायपर तोडले आणि त्यासह चालकाच्या बाजूची काच फोडली. त्यांनी चालकाला बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला.

या तिघांनी त्याच्या डोक्यावर, नाकावर आणि पाठीवर हल्ले केले आणि "बेस्ट लोक जनतेला त्रास देतात" असे म्हणत शिवीगाळ केली, असे चालकाने म्हटलं आहे. दरम्यान, बेस्टचे प्रवक्ते सुनील वैद्य यांनी बसचालकांना मारहाण करू नये, अशी विनंती केली आहे. दुसरीकडे, बेस्ट समितीच्या एका माजी सदस्याने त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी "बेशिस्त चालकांना" जबाबदार धरले आहे.