Bengaluru Crime: महिलेचे लखनऊ येथून अपहरण करून बेंगळूरूमध्ये बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल
Representative Image

Bengaluru Crime: लखनऊ मध्ये एका 21 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर दुरच्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली परंतू बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर पोलीसांनी  328 (विषप्रयोग), 342 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे), 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, बहराइचमधील एका नातेवाईकाने ऑगस्टमध्ये चारबाग येथील गुरु नानक गर्ल्स डिग्री कॉलेजमधून घरी परतत असताना तिला ड्रग्ज असलेले कोल्डड्रिंग्ज प्यायला दिले. जेव्हा ती तिच्या घराजवळील क्रॉसिंगवर आली, तेव्हा आरोपींनी तिला ऑटोरिक्षात बसवण्यास भाग पाडले आणि चाकूचा धाक दाखवून तिला पळवून नेले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.महिलेला बळजबरीने बेंगळूरला नेले. विमानातून नेण्यासाठी तीच्याकडून सर्व कागदपत्रे हिसकावून घेतली. आणि बेंगळूरूला जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दिलेल्या तक्रारानुसार, आरोपीने तीला एका बंद खोलीत बांधून ठेवलं होत. दोन दिवसांनी शेजारच्यां मदतीने तीने स्वत:ची सुटका केली. आणि धावत पोलीस स्टेशन गाठलं. तीने सर्व हकिकत सांगितली. आई वडिलांच्या मदतीने  पोलिस ठाण्यात आरोपींविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला.