प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, टिकटॉक व्हिडिओच्या (Tik-Tok Video) माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका तरुणाला धारूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीविरोधात कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2), 188 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे घडली आहे. लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर चुकीच्या माहिती पसरवल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनाथ बाळासाहेब केंद्रे असे या आरोपीचे नाव आहे. तो अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे राहतो. त्याने टिक-टॉकवर व्हिडिओ बनवून दोन धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला आज न्यायालयात हजर केले आहे. तसेच धरूर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अफवा, जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो यावर बंदी आहे. चुकीची माहिती परवल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात आतापर्यंत 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- मुंबई: मरीन ड्राईव्ह येथे सेगवे सिस्टमचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

ट्वीट-

लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत खोटी माहितीचा प्रसार केल्याप्रकरणी 467 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 255 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहीती महाराष्ट्र सायबरच्या ट्विटर हॅंडलवरून देण्यात आली आहे.