मुंबई: मरीन ड्राईव्ह येथे सेगवे सिस्टमचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
Segway System (Photo Credit: Twitter)

मुंबईत (Mumbai) आज मरी ड्राईव्ह (Marine Drive) येथे सेल्फ बॅलेसिंग इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजेच सेगवेचे (Segway System) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे आत्याधुनिकरणाचे काम राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत चौपटी परिसरात नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सेगवेच्या साहाय्याने गस्त घालण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. बांद्रा, जुहू आणि वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेगवे देण्यात येणार असल्याचे समजत आहे. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सेगवे सिस्टम दाखल झाल्याने येथील पोलिसांना अधिक फायदा मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

मरिन ड्राईव्ह येथे सेगवेचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, मुंबईचे डीसीपी, मुंबई पोलिस आयुक्त, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या मास्कला माईक लावण्यात येणार आहे. ज्यामुळे ते लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सूचना देऊ शकतात, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र हादरले! राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

अनिल देशमुख यांचे ट्वीट-

मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह येथे तब्बव 50 सेगवे सिस्टमचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यापैकी वरळी पोलिसांकरिता 10 तर, नरिमन पॉईंटसाठी 5 सेगवे सिस्टम देण्यात येणार आहेत. तसेच वांद्रे, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेगवे देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.