बीड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणार्‍यावर महिला शिवसैनिकेने फेकली शाई (Watch Video)
बीड शाईफेक प्रकरण । Photo Credits: Twitter

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांवर दमदाटी करणारा बीड (Beed) मधील एक व्हिडिओ आता समोर आला आहे. कथित शिवसेना कार्यकर्ता महिलेने आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या व्यक्तीच्या अंगावर शाई ओतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडीयावर आक्षेपार्ह लिखाण पाहून संतप्त झालेल्या काही शिवसैनिकांनी त्या संबंधित व्यक्तीला गाठलं. त्यानंतर काळ्या शाईची बाटली संबंधित व्यक्तीच्या अंगावर ओतली. सध्या ANI या वृत्तसंस्थेने या प्रकाराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बीड मधील इंक फेकल्याचा व्हिडिओ

दरम्यान मागील आठवड्यात अशाच प्रकारे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार्‍या हिरामणी तिवारी  व्यक्तीचं मुंडण करण्यात आलं होतं. त्यानंतर याप्रकरणी काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील मारहाणीची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर राज्यात या प्रतिक्रिये तीव्र प्रतिसाद उमटले होते.