सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले 'शिवकन्या'चे पालकत्व
Dhananjay Munde And Supriya Sule (Photo Credit: Facebook)

एकीकडे मुलीला लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणून तिची मुर्तीरूपात पूजा करतात तर, दुसरीकडे याच समाजात नकोशी म्हणून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. या गोष्टींवर आळा घालण्यासाठी राज्यात आणि केंद्र सरकारने अनेक कठोर कायदे केले आहेत, मात्र तरीही अनेकदा मुलीला कचऱ्याच्या पेटीजवळ किंवा निर्जन ठिकाणी एकटे सोडून आई-बाप निघून गेल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यातच बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parali) शहरात नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भकाला रेल्वे रुळाजवळ असेलल्या काटेरी झुडपात बाळाला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याच बालिकेचे बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पालकत्व स्वीकारले आहे. यामुळे सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

महाशिवरात्री महोत्सवादरम्यान कोणीतरी स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे रूळावर सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच त्यांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखले केले. इतकच नव्हे तर धनंजय मुंडे आणि खासदार  सुप्रिया सुळे यांनी  या मुलीचे पालकत्व स्विकारले असून तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी यांनी स्विकारली आहे. महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडल्याने नवजात मुलीचे ‘शिवकन्या’असे नामकरण करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या कामगिरीची सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच शिवकन्या सुखरूप असून तिच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. हे देखील वाचा- कोरेगाव भीमा प्रकरण: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार; उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांची माहिती

ट्वीट-

दरम्यान, नेमका हा प्रकार कोणी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आजही समाजात स्त्री- पुरूष यांच्यात भेदभाव केला जात आहे. यातून स्त्रीभ्रुण हत्येसारखा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.