देशभरातील विविध बँकांच्या कामकाजाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यानुसार नागरिकांना बँकेची कामे करण्यासाठी वेळ देऊ केला जातो. मात्र काहींमध्ये बँकांच्या कामकाजाच्या वेळा वेगळ्या असल्याने संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी आता इंडियन बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला असून देशभरातील बँका दिलेल्या वेळेत सुरु राहणार आहेत. बँक शाखांच्या वर्गवारीनुसार त्यांचे कामकाज तीन वेळेत विभागले जाणार आहे.
देशभरातील बँका आता नव्या वेळापत्रकानुसार सकाळी 9 ते 3, 10 ते 4 आणि 11 ते 5 या वेळेनुसार बँकेचे कामकाज सुरु राहणार आहे. हे नवे वेळापत्रक येत्या नोव्हेंबर महिन्यापासून देशातील विविध बँकांसाठी लागू करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक क्षेत्रामधील बँका सकाळी 9 ते 4 वेळेत सुरु राहिल. तसेच 9 ते 3 वाजल्याच्या दरम्यान नागरिकांना बँकेचे व्यवहार करता येणार आहेत. व्यापारी विभागीतल बँकांचे कामकाज सकाळी 11 ते 6 मध्ये होणार आहे. पण खातेधारकांना 11 ते 5 मध्ये बँकेचे काम करता येणार आहे. त्याचसोबत अन्य परिसरातील बँक शाखा 10 ते 5 या वेळेत सुरु राहणार आहे. तर ग्राहकांना 10 ते 4 दरम्यान कामे पूर्ण करता येणार आहेत.(22 ऑक्टोबरला बँकांचा संप, SBI-BoB यांनी ग्राहकांना दिली 'ही' पूर्वसुचना)