22 ऑक्टोबरला बँकांचा संप, SBI-BoB यांनी ग्राहकांना दिली 'ही' पूर्वसुचना
File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशातील 10 बँकांच्या विलिनिकरणाचे आवाहन केले होते. मात्र या विलिनिकरणाला विरोध दर्शवत आता बँकेच्या युनियनकडून 22 ऑक्टोबरला एकदिवशीय संपाची हाक दिली आहे. यामुळे जास्तकरुन सरकारी बँकांचे कामकाजात अडथळा येण्याची शक्यता आहे. यामुळेच बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि एसबीआय (SBI) बँकेने त्यांच्या ग्राहकांना पूर्वसुचना दिली आहे.

बँकेने असे म्हटले आहे की, संपादरम्यान त्यांच्या विविध शाखांमध्ये आणि कार्यालयात कामकाज सामान्य पद्धतीने होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. त्याचसोबत चेतावणी देत म्हटले की, जर संप झाल्यास बँकेच्या संपूर्ण कामकाजावर त्याचा परिणाम होण्याती शक्यता आहे. मात्र या संपाचा अधिक भार एसबीआय बँकेवर होणार नाही आहे. एसबीआयच्या मते बहुतांश कर्मचारी हे संपामध्ये सहभागी होणाऱ्या युनियनचेच सदस्य आहेत. तसेच संपादरम्यान किती रुपयांचे नुकसान होईल याचा अंदाज न व्यक्त करण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रला ही या संपाचा परिणाम कामकाजावर जास्त होणार नाही अशी आशा आहे.(Bank Holidays: पुढील 14 दिवसांमध्ये सहा दिवस बँक राहणार बंद, आजच कामे आटोपून घ्या)

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ यांनी 22 ऑक्टोबरला संपाची हाक दिली आहे. या प्रकरणाला भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस यांनी सुद्धा समर्थन दिले आहे. ही संपाची हाक 10 बँकांच्या विलिनिकरणाच्या विरोधात देण्यात येणार आहे. बँकांच्या विलिनिकरणानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येणार आहे. तर आंध्रा बँक, इलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायडेट बँक ऑफ इंडिया आणि ओरियंएटल बँक ऑफ कॉमर्स यांचे अस्तित्व संपणार आहे.

22 ऑक्टोबर व्यतिरिक्त 26 तारखेला शनिवार असल्याने अधिकतर बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 27 तारखेला दिवाळी आणि रविवार आहे. त्यानंतर 28 तारखेला गोवर्धन पूजा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने देशातील विविध ठिकणी बँका बंद राहणार आहेत.