Bank Holidays: पुढील 14 दिवसांमध्ये सहा दिवस बँक राहणार बंद, आजच कामे आटोपून घ्या
Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

ऑक्टोबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु जर तुमची बँक संदर्भातील काही कामे बाकी असल्यास ती लवकरत आटोपून घ्या. कारण पुढील 14 दिवसात काही सण येणार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक बंद राहिल्याने कोणतेही काम अडून न राहण्यासाठी कामे आधीच करुन घ्या.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 बँकांच्या विलयाच्या विरोधाक 22 ऑक्टोबरला युनियन बँकेने संपाची हाक दिली आहे. खरतर हा संप भारतीय बँक कर्मचारी परिसंघ यांच्याकडून करण्यात येणाऱ्या भारतीय ट्रेड युनियन यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जर संप पुकारल्यास बँक बंद राहणार आहेत. तर 20 ऑक्टोबरला रविवार आल्याने ही बँक बंद असणार आहे.(Bank Holidays in October 2019: पुढच्या महिन्यात तब्बल 11 दिवस बँका असणार बंद; वेळेत उरकून घ्या पैशांची कामे)

नुकत्याच बँकांच्या विलयामुळे 4 नव्या बँक अस्तित्वात येणार आहेत. या विलयानंतर इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे अस्तित्व संपणार आहे. तर 26 ऑक्टोबरला शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे. 27 ऑक्टोबरला दिवाळी असून बँकेचे काम होणार नाही आहे. त्यानंतर ही काही सण असल्याने बँका बंद राहणार आहेत. तसेच 28 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा आणि 29 ऑक्टोबरला भैय्या दूज असल्याने बँकेचे कामकाज होणार नाही आहे. तर 21 तारखेला ही विधानसभा निवडणूक असल्याने बँक बंद असणार आहे.