Balu Dhanorkar Health Update: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती
Balu Dhanorkar | (File Image)

काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे वृत्त आहे. बाळू धानोकर यांना आतड्यांमध्ये संसर्ग झाला असल्याने त्यांना एअर ऍम्बुलन्सच्या माध्यमातून दिल्लीला हलवण्यात आल्याचे समजते. धानोरकर यांच्या वडिलांची नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पुढच्या काहीच काळात बाळू धानोरकर यांनाही प्रकृतीअस्वास्थ्य जाणवू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेक चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, धानोरकर यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती (Balu Dhanorkar Health Update) देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून सुरु असलेल्या उलटलट वृत्तांना पूर्णविराम देण्यासाठी बाळू धानोरकर यांच्या कार्यालयातून अवाहन करण्यात आले आहे. धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अवाहनामद्ये म्हटले आहे की, खासदार बाळू धानोरकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यांचे शरीर उपचाराला पूर्ण प्रतिसाद देत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतून कोणीही अफवा पसरवू नये. कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळेपर्यंत सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास ठेऊ नये. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आपण प्रार्थना करुया, असेही कार्यालयाने म्हटले आहे. (हेही वाचा, खासदार बाळू धानोरकर यांची तब्येत खालावली; उपचारांसाठी नागपूर वरून दिल्लीला हलवणार)

बाळू धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी स्वत:हूनच आपले कार्यकर्ते आणि आप्तेष्टांना माहिती दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले होते की, 'काल शनिवार दिनांक 27 मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परंतू, आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जा आहे. माझी प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी घाबरुन जाऊ नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे.'

ट्विट

दरम्यान, दरम्यान, धानोरकर यांच्या कार्यालयाने आज म्हटले आहे की, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पीटलमध्ये उपाचर सुरु आहेत. त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेऊ नये. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याासठी आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभण्यासाठी आपण प्रार्थना करुया.