Balu Dhanorkar Health Update:  खासदार बाळू धानोरकर यांची तब्येत खालावली; उपचारांसाठी नागपूर वरून दिल्लीला हलवणार
Dhanorkar | Twitter

कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना पितृशोक झाल्यानंतर आता त्यांची देखील प्रकृती खालावली आहे. किडनी स्टोन वर उपचार घेत असलेले बाळू धानोरकर यांच्या आतड्यांमध्ये इंफेक्शन झाल्याने त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने नागपूर मधील दिल्लीला हलवले जाणार आहे. दरम्यान बाळू धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे. आपली प्रकृती स्थिर आहे. काही चाचण्या आणि उपचारांसाठी दिल्ली जात असल्याचा मेसेज त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

बाळू धानोरकर यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांनी वयाच्या 80 व्या वर्षी काल नागपूर मध्ये अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल वडिलांच्या अंत्ययात्रेमध्येही सहभागी होता आले नाही. नारायणरावजींच्या पार्थिवावर चंद्रपूर मध्ये भद्रावती गावामध्ये अंत्यसंस्कार झाले आहेत.

दिल्लीच्या वेदांता हॉस्पिटलमध्ये बाळू धानोरकर यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत असल्याचं बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Chandrapur: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यात घरफोडी; पोलिसांकडून तिघांना अटक .

दरम्यान बाळू धानोरकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर  सुप्रिया सुळे, नरहरी झिरवळ यांनी  शोक व्यक्त केला आहे.