Chandrapur: काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यात घरफोडी; पोलिसांकडून तिघांना अटक
Balu Dhanorkar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे पुढे आले आहे. चोरट्यांनी चक्क खासदाराचेच घर फोडण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रपूर (Chandrapur) शहरातील सरकार नगर येथे असलेल्या धानोरकर यांच्या 'सूर्यकिरण' बंगल्यात ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा धानोरकर यांच्या पत्नी आणि चौकीदारच घरी उपस्थित होते. सुदौवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.

धानोरकर हे या बंगल्याचा वापर निवासासाठी करतात. या बंगल्यात आगोदर धानोरकर यांचे कार्यालय होते. मात्र आता त्यांनी हे कार्यालय इतरत्र हलवले आहे. त्यामुळे आता ते या बंगल्याचा वापर केवळ निवासासाठी करतात. दरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी धानोरकर हे बंगल्यास मुक्कामी नव्हते. चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. त्यानंतर बंगल्यातील इतरही खोल्यांचे कुलूपे तोडून त्यांनी आत प्रवेश केला. घरातील सामनांची उलथापालत करत त्यांनी हे सामान अस्ताव्यस्त फेकले. चोरट्यांकडून काही सामांनाची या वेळी नासधूसही झाली. (हेही वाचा, Chandrapur: काँग्रेसचा अंतर्गत वाद ठाकरे सरकारच्या डोक्याला ताप, Congress खासदाराकडून CBI चौकशीची मागणी;अमित शाह यांच्याकडूनही अश्वासन)

बाळू धानोरकर यांच्या चौकीदाराने दिलेल्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, धानोरकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला तेव्हा त्याच परिसरात त्याच रात्री इतरही एकदोन ठिकाणी घरफोडी झाली आहे. पोलिसांनी जेव्हा बंगल्याचे सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यात तीन चोर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करताना आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा 24 तासात छडा लावला. रोहित इमलकर, शंकर नेवारे आणि तन्वीर बेग अशा तिघांना या प्रकरणात ताब्यात घेतले.