मुंबई मध्ये एनसीपी नेता बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक मोठे खुलासे होत आहेत. मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून या खून प्रकरणाचे धागेदोरे शोधले जात असताना आता पंजाब मधील आकाशदीप गिल (Akashdeep Gill) कडून काही खुलासे झाले आहेत. त्याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिष्णोई हा शुभम लोणकर, झिशान अख्तर शी बातचीत करत होता. यावेळी तो मजदूरांच्या हॉट्स्पॉटचा वापर करत असल्याने त्याचं लोकेशन ट्रॅकिंग होत नव्हते. त्यामुळे तांत्रिक गोष्टीचा गैरफायदा घेत त्याने प्लॅन रचल्याचं म्हटलं आहे.
क्राईम ब्रांचच्या चौकशी मध्ये फाजिल्का मधीम आकाशदीप ला अटक करण्यात आली आहे. त्याने या प्रकरणात मास्टरमाईंड अनमोल बिष्णोई सोबत, हत्येच्या प्लॅन बाबत शुभम लोणकर आणि झिशान अख्तर प्रमाणेच शूटर शिव कुमार गौतम सोबत बोलत असल्याचं म्हणाला आहे. यावेळी शेतामध्ये काम करत असलेल्या मजूराच्या मोबाईल हॉटस्पॉटचा तो वापर करत होता. त्याने ही शक्कल पोलिसांपासून लपण्यासाठी त्याने वापरल्याची कबुली दिली आहे. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ Anmol Bishnoi ला अमेरिकेत अटक .
क्राइम ब्रँचला दिलेल्या माहितीत बलविंदर नावाच्या मजुरानेही इंटरनेट कॉलसाठी त्याचा हॉटस्पॉट वापरल्याची पुष्टी केली आहे. चौकशीदरम्यान गिलने या मजुराचा वापर इंटरनेट हॉटस्पॉटसाठी केल्याची कबुलीही दिली. आरोपी आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि शेतात काम करणाऱ्या बलविंदरच्या हॉटस्पॉटचा वापर करून इंटरनेटशी कनेक्ट करायचा. कोणीही त्याचा फोन शोधू नये म्हणून त्याने ही युक्ती वापरली आणि त्याचा फोन ऑफलाइन दिसला.
लॉरेंस बिष्णोई गॅंगने बाबा सिद्दीकींच्या मर्डर साठी स्पेशल 26 शूटर्सची टीम सज्ज ठेवली होती.
बाबा सिद्दीकींची हत्या मुंबई च्या वांद्रे पूर्व भागात 12 ऑक्टोबर 2024, दसर्याच्या रात्री 9.30 च्या सुमारास झाली. या हत्येनंतर बिष्णोई गॅंगचा या हत्येत हात असल्याचा दावा एका पोस्ट वरून करण्यात आला आहे पण पोलिस सध्या या प्रकरणाचा सगळ्याच बाजूने तपास करत आहेत.