Lettuce Pack मधून निघाला विषारी साप, कुटुंबीयांची भीतीने उडाली गाळण
Snake | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ऑस्ट्रेलियातील (Australia) एका कुटुंबाची भीतीने चांगलीच गाळण उडाली. जेव्हा त्यांच्या घरात कोबीमधून साप निघाला. बाजारातील कोबी वेष्टणात गुंडाळून घरी आणल्यामुळे घडली. प्राप्त माहितीनुसार ऑस्ट्रेलिया (Australia) देशातील सिडनी (Sydney) प्रांतात एका व्यक्तीने बाजारातून कोबी (Lettuce) आणला. कोबीचे पॅकींग (Lettuce Pack) घेऊन तो घरी गेला. घरी जाऊन त्याने पॅकींग उघडले. पॅकींग उघडताच त्यातून एक साप बाहेर पडला. धक्कादायक असे की हा साप विषारी असल्याचे थोड्या वेळातच स्पष्ट झाले. घरातील मंडळींनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला खरा. परंतू, घरातल्यांची मात्र भीतीने चांगलीच गाळण उडाली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एका वृत्तात म्हटले की, सिडनी (Sydney) प्रांतात राहणाऱ्या अलेक्जेंडर व्हाइट (Alexander White) आणि त्याची पार्टनर एमिली नेटी (Amelie Neate) यांनी एल्डी स्टोरमधून पत्ता कोबी भाजी खरेदी केली. दुकानदारानेही कोबी पॅक करुन दिला. दोघेजन हा कोबी घेऊन घरी गेले. घरी जाऊन त्यांनी हे पॅकींग उघडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पॅकींगमधून एक विषारी साप (Venomous Snake) बाहेर पडला.

धक्कादायक असे की (Venomous Snake) हा कोबीच्या पॅकींगमधून बाहेर निघून अलेक्जेंडर व्हाइट (Alexander White) आणि त्याची पार्टनर एमिली नेटी (Amelie Neate) यांच्या बॅगमध्ये फिरत होता. त्यांनी जेव्ह घरी आल्यावर बॅगेत पाहिले तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. साप जीभ बाहेर काढत होता. द गार्डियनने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, साप फारसा मोठा नव्हता. ते एक सापाचे पिलू होते. जो केवळ 20 सेंटीमीटर इतका लांब होता. सर्पमित्रांनी कुटुंबीयांना सांगितले की, हा साप साधासुधा नव्हता. ते साधे पिल्लू असले तरी ते विषारी सापाच्या प्रजातीमधील आहे.