औरंगाबाद (Aurangabad) येथे हळद सुरु असताना नाचल्यामुळे दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद ऐवढा विकोपाला गेली की नाचणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे.
आकाश असे तरुणाचे नाव आहे. आकाश हा भाचीच्या लग्नात डान्स करत आहे. त्यावेळी चुलत भावासोबत डान्स करण्यावरुन भांडण झाल्याने त्यामधील एकाने आकाशला चाकूने भोकसले.(संतापजनक! पुण्यात चुकीचे उपचार दिल्याने गर्भवती महिला व नवजात अर्भकाचा मृत्यू; गुन्हा दाखल, डॉक्टर फरार)
या प्रकरणी आरोपीने चाकू हल्ला केल्यानंतर घटनास्थळापासून पळ काढला. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.