दलाई लामा (संग्रहित संपादित प्रतिमा)

बुद्धाचे विचार, त्याचा संदेश, प्रेम-करुणा-दयेचे महत्व संपूर्ण देशाला समजावे म्हणून, औरंगाबादच्या (Aurangabad) अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या (Ajanta Ellora Caves) परिसरात जागतिक धम्म परिषद (Global Buddhist Congregation) आयोजित केली गेली आहे. 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही परिषद पार पडेल. महत्वाचे म्हणजे या परिषदेसाठी दलाई लामांची (Dalai Lama) उपस्थितीत लाभणार आहे. दलाई लामा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजीनागसेनवन येथील, पीईएस मिलिंद कॉलेजच्या स्टेडियमवर संध्याकाळी पाच वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. विनयरखिता महाथेरो यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

अखिल भारतीय भिक्षु संघटनेचे अध्यक्ष भिक्षु सदानंद महाष्टीवीर महातेरो यांनी बुधवारी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, ‘दलाई लामा औरंगाबाद येथे दोन दिवस मुक्काम करतील आणि बौद्ध परिषदेत दोन सभांना संबोधित करतील.‘ यावेळी दुसऱ्यांदा दलाई लामा औरंगाबादला भेट देणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान बौद्ध धर्माशी संबंधित विविध विषयांवर व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जाईल. आजच्या काळातील बौद्ध धर्म, बौद्ध संस्कृती आणि राहणीमानाच्या प्रासंगिकतेच्या विषयांवरही चर्चा होईल. यासोबतच काही सांस्कृतिक कार्य्क्रमानाचे आयोजनही केले आहे.

(हेही वाचा: NRC लागू झाल्यानंतर हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन निर्वासित भारतातच राहतील- अमित शाह)

या जागतिक परिषदेमध्ये जपान, थायलंड, नेपाळ, चीन, कोरिया, मलेशिया, श्रीलंका, जपान, भूतान, ब्रह्मदेशांसह इतर अनेक देशांतून बौध्द भिक्खू आणि अभ्यासक औरंगाबाद येथे दाखल होणार आहेत. देश आणि विदेशातील मिळून एकूण 450 भिक्खू व इतर 1 लाख लोक या परिषदेला हजेरी लावतील असा अंदाज आहे.