Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथे गेल्या 24 तासात तब्बल 720 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडावर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत आहे.

औरंगाबाद येथे गेल्या 24 तासात आढळून आलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 65 हजार 678 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 4 हजार 327 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक असून नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाचे नियम अधिक करण्यात आले आहेत. हे देखील वाचा- Solapur: सोलापूर येथील धक्कादायक घटना; घशात साबुदाणा अडकल्याने एका अल्पवयीन मुलाचा गुदमरून मृत्यू

महाराष्ट्रात काल (शनिवारी, 13 मार्च) 15 हजार 602 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 7 हजार 467 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात सध्या एकूण 1 लाख 18 हजार 525 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.