खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद महारापलिकेत जोरदार राडा; 5 नगरसेवक निलंबीत
Aurangabad Municipal Corporation | (File Photo)

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) खासदार इम्तियाज जलील याच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत आज जोरदार राडा झाला. नवनिर्वाचीत खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एमआयएम (MIM) पक्ष नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवला. या वेळी इतर पक्षांचे नगरसेवक आक्रमक झाले. यातून सभागृहात जोरदार राडा झाला. या राड्यादरम्यान गोंधळ घालणाऱ्या पाच नगरसेवकांना निलंबीत केल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी काही वादग्रस्त उद्गार काढल्यामुळे वातावरण तापले. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एमआयएम नगरसेवकांनी खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. त्याला महापौरांनी नकार दर्शवला. तसेच, राज्यातील सर्वच खासदारांचे अभिनंदन करावे अशी सूचना केली. महापौरांच्या सूचनेवरुन एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले. (हेही वाचा, औरंगाबाद: ऐतिहासिक वास्तू 'बिबी का मकबरा' ची पडझड, पुरातत्व विभागाच्या कामगिरीवर शंका उपस्थितीत)

दरम्यान, सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावरुन चर्चा सुरु होती. गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना केवळ अभिनंदनाचा ठराव काही लोकांना मोठा वाटतो. या लोकांना शहराच्या विकास, प्रश्न, समस्या यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. म्हणूनच गंभीर विषय सुरु असताना काही नगरसेवक असे मुद्दे उपस्थित करतात, टीका पालिकेतील भाजप गटनेत्यांनी केली आहे.