Maharashtra MLC Election 2020: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 (Aurangabad Graduate Constituency Election 2020) बाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची ठिकाणे (raduate Constituency Election 2020 Polling Stations) जाहीर केली. यात मतदान केंद्र व सहायकारी मतदान केंद्र अशा एकूण 74 मतदान केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान, मतदान केंद्र असलेल्या इमारतीचे नाव, मतदान केंद्राची व्यप्ती निश्चीत करण्यात आली आहे. याबाबत कोणाला सूचना, हकरकती असल्यास त्या येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये यांचे नोटीस बोर्डावर औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 2020 बाबत निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी मंगळवारी (6 ऑक्टोबर 2020) जाहीर करण्यात आली. ही यादी मतदार आणि इच्छुकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरसुद्धा पाहता येणार आहे. मतदार ही यादी पाहू शकतात तसेच तिचे परीक्षणही करु शकातत. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला? पाहा कोणाच्या नावाची चर्चा?)
दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार, मतदान केंद्र व्याप्ती, स्वरुप आदींबाबत जर कोणाला आक्षेप, हकरत, सूचना असतील तर सबंधितांनी प्रारुप मतदारसंघाची यादी प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून पुढच्या सात दिवसांपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा.
मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नाव, मतदान केंद्राची व्याप्ती यांबाबत आपल्या सूचना, आक्षेप हरकती संबंधितांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत. हा कालावधी 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.