ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) कालावधीत मोठ्या राजकीय घोळ्यानंतर शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे (Shirdi Sai Baba Sansthan) विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात आले होते. तीन पक्षांच्या सरकारमुळे कोटा ठरणे आणि त्यानुसार नियुक्ती होण्यास विलंब लागला. पहिल्या टप्प्यात अध्यक्ष आणि काही सदस्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर मोठ्या कालवधीनंतर उर्वरीत सदस्यांची नियुक्ती झाली. मात्र विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना सरकारने स्वत: च केलेला कायदा पाळला नाही, असा आरोप करून कोपरगावमधील (Kopargaon) साईभक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह अन्य काही भक्तांनी याचिका दाखल केल्या. तरी संबंधित याचिकेवर अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने आज निकाल दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे (Shirdi Sai Baba Sansthan) विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून (High court) अखेर बरखास्त करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.तसेच पुढील 8 आठवड्यात नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावं, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपवण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने शिर्डी संस्थानास (Shirdi Sai Baba Sansthan) दिले आहे. तरी पुढील आठ दिवसात नियुक्त होणाऱ्या विश्वस्त मंडळात कुणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. (हे ही वाचा:- Raju Patil On Anurag Thakur: मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटलांचा थेट केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना खोचक टोला)
तरी राज्यात काही महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas aghadi Government) जावून शिंदे फडणवीसांची (Shinde Fadnavis Government) सत्ता स्थापन झाली आहे. तरी महाराष्ट्रातील (Maharashtra) या सत्तांतराचा परिणाम शिर्डीतील (shirdi) साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळावर होतो का हे बघण महत्वाचं ठरणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यात देवस्थानाचा कारभार त्रिसदस्याय समिती बघणार आहे.