औरंगाबादमध्ये (Aurangabad) आज 64 जणांची कोरोना चाचणी (Corona Test)
पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2 हजार पार झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2014 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 731 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Coronavirus Home Quarantine Guidelines: कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसाठी घरी विलगीकरण करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर)
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2014 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 731 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त: https://t.co/Dcq9BusefG pic.twitter.com/GzkNeCVf2v
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) June 7, 2020
दरम्यान, आज औरंगाबादमध्ये कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी दिवसभरात 2739 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 82968 वर पोहोचली.