Home Quarantine (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा  (Coronavirus) प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारडून वेळोवेळी त्या संबंधित नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारने कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास घाबरुन जाऊ नये पण त्या संबंधित चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी क्वारंटाइन आणि कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. याच दरम्यान आता राज्य सरकारकडून ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत त्यांच्यासाठी घरी विलगीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसले तरीही आतापर्यंत बहुतांश रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसुन आले आहे. तर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मार्गदर्शक सुचना येथे पहा.(कोविड-19 च्या संकटात Patym कडून 3 लाख Hygiene Products ची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार)

दरम्यान, महाराष्ट्रातील पुण्यात आणि मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळुन येत आहेत. तर मुंबईत शनिवारी 1 हजार 274 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा मुंबईतील आकडा 47 हजार 128 वर पोहचला आहे. त्यापैकी 1 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 80 हजारांच्या पार गेला असून 2969 जणांचा मृत्यू झाला आहे.