Pune Crime: भरदिवसा तरुणीवर कोयत्यने हल्ल्याचा प्रयत्न,दोघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील थरारक घटना CCTV कैद
Crime (PC- File Image)

Pune Crime: पुणे शहरात नेमकं काय चाललं आहे? भरदिवसा तरुणांवर कोयत्याने हल्ला तर कधी भररस्त्यात मारहाण. हे चित्र पाहून असे दिसते की, पोलिसांचा हल्लेखोरांना धाक उरलाच नाही. काही दिवसांपूर्वी तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे युवतीचे प्राण वाचले. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील सुभाषनगर येथे सोमवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. (हेही वाचा- तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा मृत्यू; महाबळेश्वर येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून ११वीत शिकणाऱ्या तरुणीवर आरोपीने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघे ही काही दिवसांपासून प्रेमसंबंधात होते. त्यानंतर युवती काही काराणावरून आरोपीशी बोलत नव्हती. हाच राग मनात धरत  आरोपीने तरुणीवर हल्ला करण्याच ठरवले. घटनास्थळावरू नागरिकांनी आरडा ओरड केल्यामुळे  दुचाकीवरून आलेले हल्लेखोर पळून गेले. महिलांना आरडाओरड केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि पीडितेचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तरुणी हल्लेखोरासोबत बोलत नव्हती त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी तीच्यावर हल्ला करायचा ठरवला. पण शेजारच्यांनी आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची माहिती खडक पोलिसांना दिली. महेश सिध्दप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा नोंद करण्यात आली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिस फुटेज तपासत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहे.