Atal Setu Mumbai | X

मुंबई मध्ये अतल सेतू (Atal Setu) आता आत्महत्यांच्या (Suicide) वाढत्या प्रकरणांमुळे अधिक चर्चेत आला आहे. मुंबई- नवी मुंबईला जोडणार्‍या या अटल सेतू वर दोन दिवसांत आता दुसरी आत्महत्येची घटना समोर आली आहे. 2 ऑक्टोबर, गांधी जयंती दिवशी अटल सेतू वर उडी मारत एका 52 वर्षीय व्यावसायिकाने जीव संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या मृत व्यक्तीचं नाव Philip Hitesh Shah असून तो मुंबई मधील माटुंगा भागातील रहिवासी होता.

. The Indian Express सोबत बोलताना Senior police inspector Anjum Bagwan यांनी दिलेल्या माहितीमध्ये ही घटना 2 ऑक्टोबरच्या सकाळी 9 ची असल्याचं म्हटलं आहे. अटल सेतू वर येऊन गाडी थांबवत त्याने जीव दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आत्महत्या केल्याचं पोलिसांना समजताच त्यांनी रेस्क्यू टीम पाठवली. शाह यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पण हॉस्पिटल मध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.गाडी मध्ये सापडलेल्या आधार कार्डावरून मृताची ओळख पटली आणि नंतर त्याच्या कुटुंबाला सांगण्यात आले.

शाह यांच्या पत्नीने फिलीप हे मानसिकरित्या स्थिर नसल्याचं म्हटलं आहे तसेच सकाळी 8 वाजता ते आपण एका कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले होते.

अटल सेतू वर तातडीने सेफ्टी नेट बसवण्याची गरज?

अटल सेतू हा मुंबई मध्ये शिवडी ते नवी मुंबईत न्हावा शेवा ला  जोडणारा सर्वात लांब सागरी सेतू आहे. पण आता या मार्गावर वाढती आत्महत्येची सत्र पाहता तातडीने सेफ्टी नेट बसवण्याची गरज समोर येत आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार, नवी मुंबई पोलिसांकडून Mumbai Metropolitan Region Development Authority कडे तातडीने सेफ्टी नेट लावण्याबाबत विनंती केल्याचं म्हटलं आहे. यामुळे आत्महत्या रोखण्यास मदत होईल अशी त्यांना आशा आहे. नक्की वाचा: Suicide Attempt on Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी चपळाईने वाचवले प्राण (Watch Video). 

दोन दिवसांपूर्वीच Sushant Chakravarti नामक 40 वर्षीय बॅंकरने अटल सेतू वरून उडी मारत आत्महत्या केली आहे.कामाचा ताण असहय्य झाल्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.

अटल सेतू वर गाडी थांबवण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. मात्र मागील 9 महिन्यातील आत्महत्यांमध्ये सर्रास लोकं गाड