Atal Setu | X

(Atal Setu) वर आज पुन्हा एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. 40 वर्षीय व्यक्तीने आपलं आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज 30 सप्टेंबर ची आहे. अटल सेतू वर आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर शिवडी पोलिसांनी (Sewri Police Station) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा तपास सुरू आहे. अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे.आज सकाळी शिवडी पोलिसांच्या हद्दीत अटल सेतूवर 8.5 किमी अंतरावर  गाडी थांबवत त्याने समुद्रामध्ये उडी मारली.

अटल सेतू वर पुन्हा आत्महत्या

आज अटल सेतू वर लाल रंगाची ब्रेझा कार आली त्यामधून एक व्यक्ती खाली उतरला आणि थेट त्याने समुद्रात उडी मारत आपलं आयुष्य संपवलं. सध्या या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे. ही घटना सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लाल रंगाची कार अटल सेतू वर आहे. या कार मध्ये असलेला व्यक्ती सुशांत चक्रवर्ती होता. सध्या समुद्रात त्याचा शोध सुरू आहे सोबतच त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान अटल सेतू वर गाडी थांबवण्यास बंदी असताना काही जण गाडी थांबवत समुद्रात उडी मारून आयुष्य संपवत असल्याचं मागील काही घटनांमध्ये दिसत आहे.

अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबई ला जोडणारा सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे. या पूलावर आत्महत्येची ही चौथी घटना आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस आणि कॅब चालकाच्या सतर्कतेने एका महिलेला जीवनदान मिळाले होते. हा अटल सेतू या आत्महत्यांच्या सत्रांमुळे चर्चेमध्ये आले आहे. या आत्महत्यांच्या घटनांनंतर अटल सेतूवर गस्त वाढवण्यात आली आहे. नक्की वाचा: Suicide Attempt on Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी चपळाईने वाचवले प्राण (Watch Video). 

अटल सेतू वर  यापूर्वी एका महिला डॉक्टर, इंजिनियर, बॅंकरने जीव दिला आहे. अटल सेतू वर काही भागात बॅरिकेटर लावले आहेत. तसेच व्ह्यू ब्लॉक होऊ नये म्हणून पारदर्शक प्लेट्स लावल्या आहेत.