Suicide Attempt on Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी चपळाईने वाचवले प्राण (Watch Video)
माहितीनुसार, मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रीमा पटेल असे या महिलेचे नाव असून ती मुलुंड येथून कॅब घेऊन अटल सेतूवर आली होती.
Suicide Attempt on Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल पुलावर गेल्या काही दिवसांत आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आज पुन्हा एकदा अटल सेतूवर अशी घटना घडली. अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शौर्य दाखवत महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिने पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, आधी कॅब चालकाने व नंतर पोलिसांनी आपल्या चपळाईने आणि धाडसाने महिलेला वाचवले. याबाबत केलेल्या चौकशीदरम्य वेळीमहिलेने आपल;या निवेदनात सांगितले की, ती काही धार्मिक वस्तूंचे तसेच देवांच्या फोटोंचे विसर्जन करत होती. याआधी जुलै महिन्यातही एका 38 वर्षीय अभियंत्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. (हेही वाचा: Suicide By Jumping Off Atal Setu: अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल)
व्हिडिओमधील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात-
*TRIGGER WARNING: VIEWER DISCRETION ADVISED*
MUMBAI VIDEO: Woman Tries To End Life By Jumping Off Atal Setu, Gets Saved By Man Who Grabs Her Hand As She Dangles From Bridge Before Cops Pull Off Dramatic Rescue.
Hats Off! #MumbaiPolice #MumbaiTrafficPolice pic.twitter.com/mP8YfWtLGW
— Abhishek Yadav (@geopolimics) August 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2024 11:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

